सिरोंचा (प्रतिनिधी) दि.२३/०८/२०२६ :- नव्याने स्थापन झालेल्या श्रीराम मंदिर सिरोंचा येथे दि.२२/०८/२०२६ला श्रीराम मंदिर वर्किंग कमिटी सिरोंचा कडून श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम अत्यंत आनंदी, उत्साही, मंगलमय वातावरणात भाविकांचा उपस्थितीत दुपारी ११:३०ते ०१:३०वाजे दरम्यान संपन्न झाला महापुजा नंतर उपस्थित भाविकांना मंदिर ट्रस्ट कडून महाप्रसाद वितरण करण्यात आले श्रावण महिना हा विशेषतः महिला साठी धार्मिक श्रध्दा, भक्ती व उपासनेचा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात प्रामुख्याने भक्तगण विधीवत पूजा अर्चना करून भगवंताचे स्मरण करतात सदर सत्यनारायण महापूजेत सहा दाम्पत्यानी सहभाग दर्शविला यात महेश आशालू मादेशी व सौ माधुरी मादेशी,नागेश दुर्गय्या पेद्दापल्ली व सौ छाया पेद्दापल्ली, गट्टू कुंदारपू व सौ जयलक्ष्मी कुंदारपू,नागेश्वर ब्रम्हय्या गागापुरपू व सौ विजयलक्ष्मी गागापुरपू ,शंकर मैसूलू बंदेला व सौ उषा बंदेला, रमेश सम्मूलू बत्तूला व सौ नंदिनी बत्तूला या सहा दाम्पत्यानी कांकणधारन करून विधिवत पूजा पार पाडली कार्यक्रमांचे पौरोहित्य धीरज शास्त्री (मिडिसिनी) यांनी विधिवत मंत्रोच्चारात पार पाडले कार्यक्रमांचे यशस्वीते साठी मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी सुदर्शन पदमगिरीवार,किरण मंडावार, भवानी तुलसिगीरी, संतोष गाधमवार,जयंदर श्रीपती, शिवाजी शिंदे, कौशिक भोगे,राजेश बद्दी,रवि गरपट्टी रुपेश संगेम, राकेश समुद्रालवार,मल्लेश आसम,राजेश नामनी, आदी चे सहकार्य लाभले.







