नारायणपूर (प्रतिनिधी) : भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन ग्रामपंचायत नारायणपूर येथे देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत नारायणपूरचे प्रशासक श्री. अशोक समय्या हरी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत नारायणपूरमधील प्रतिष्ठित नागरिक, प्राथमिक शाळा कारसपल्ली येथील शिक्षक व विद्यार्थी, भोगापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कारसपल्ली येथील कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, गावातील महिला तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. भारतमातेच्या जयघोषाने आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने परिसर दुमदुमून गेला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन केले. स्वातंत्र्य, एकता, बंधुता आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.ग्रामपंचायत नारायणपूर येथे आयोजित स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
हिंदू एकता पोर्टल






