चंद्रपूर, दि. २ ऑगस्ट २०२६ : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिषद व राष्ट्रीय छात्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ प्रांत बैठक चंद्रपूर येथे उत्साहात संपन्न झाली.ही बैठक रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालय, जटपुरा, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस विदर्भातील विविध जिल्ह्यांतील एकूण १०६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संघटन कार्याचा आढावा घेतला.बैठकीस केंद्रीय संघटन मंत्री श्री. रणछोडभाई भरवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद महाराष्ट्र/गोवा क्षेत्रीय महामंत्री श्री. किशोर दिकोंडवार, प्रांत मंत्री श्री. योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ अध्यक्ष श्री. अनुप जायसवाल, महामंत्री श्री. यजेंद्रसिंह ठाकूर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ कोषाध्यक्ष श्री. वैभव कपूर, डॉ. अमित जायसवाल (एमबीबीएस), श्री. सुयोग खटी यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीमध्ये संघटन बळकटीकरण, नवीन सदस्य नोंदणी, संघटनाचा विस्तार, आगामी उपक्रमांचे नियोजन तसेच भविष्यातील कार्ययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा, विधानसभा व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संघटन अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला.॥
धर्मो रक्षति रक्षितः ॥वंदे मातरम् । जय श्रीराम । 🚩







