सिरोंचा (प्रतिनिधी)दि ०७/१०२०२६:- सिरोंचा येथील आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी दि ०४/१०/२०२६ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(अजित पवार गट)महिला आढावा बैठक घेण्यात आली माजी केबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महिला सरचिटणीस सौ. पुष्पाताई अलोणे व महिला जिल्हा कार्याध्यक्षा सौ. सारिकाताई गडपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिला आढावा बैठक घेण्यात आली यांनी. यावेळी सिरोंचा नगरपंचायत चा नगराध्यक्षा सौ पदमाताई सतिश भोगे, राष्ट्रवादी काँग्रेस चे महिला तालुकाध्यक्षा सौ ललिता चल्ला, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली, नगरसेविका सपना तोकला,पदमा पिल्लीवार, भवानी गणपूरपू, महेश्वरी पेद्दापल्ली, उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती सतीश गंजीवार , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बानय्या जनगाम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र रालबंडीवार, नगरसेवक सतीश भोगे ,शहर अध्यक्ष रवि सुलतान, आदी हि आवर्जून उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सौ सारिकाताई गडपल्लीवार यांनी महिला आढावा बैठक घेण्या मागचा उद्देश स्पष्ट केला .प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ पुष्पाताई अलोणे यांनी महिलांनी चुल आणि मुल पर्यंत मर्यादित न राहता महिलांचा समस्या सोडविण्यासाठी समाजकारण करण्यासाठी पुढे यावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या योजना चा माहीती व सर्व सामान्य महिला पर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे.असे उपस्थित महिलांना संदेश देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी ही महिलांना मार्गदर्शन करतांना आपली संघटना बळकट आहेच त्याला अधिक वृध्दिंगत करण्यात यावी व आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव सुरेंद्र अलोने यांनी केले सदर महिला आढावा बैठक आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या सिरोंचा येथील निवासस्थानी पार पडली.








