सिरोंचा.(प्रतिनिधी )दि ०६/१०/२०२६:-सिरोंचा तालुक्यातील मादगी समाज संघटना कडून समाज भवन मागणी चे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष रवि सुलतान यांच्या नेतृत्वाखाली मादगी समाज बांधवांनी आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना दि ०४/१०/२०२६ ला निवेदन सादर केले.निवेदना नुसार,मादगी समाज हा अत्यंत मागासलेला समाज असून तालुक्यात एकूण दहा हजार हून अधिक लोकसंख्या असलेल्या समाज आहे आम्हाला कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम तथा विवाह सोहळे व महापुरुषांच्या जयंती या सारख्या कार्यक्रम घेण्या करीता तालुका स्तरावर कोठे ही समाज भवन उपलब्ध नसल्याने आमच्या समाजातील कार्यक्रम घेण्याकरिता इतरत्र भटकंती करावी लागत आहे एवढे वर्ष आमच्या समाजाचा अज्ञानीपणामुळे आम्हाला काय करायचे,कसे करायचे हे सर्व कळत नव्हते म्हणून सारे त्रास भोगावे लागले आमच्या सर्व अडचणी दूर करण्याकरीता आमचा समाजावर दया दाखवून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज भवन मंजूर करून देण्याची मागणी करण्यात येत आहे निवेदनावर मादगी समाज संघटना अध्यक्ष देवय्या येनगंदुला, उपाध्यक्ष वेंकटी दासरी, सचिव समय्या चिलमुला आदींचे स्वाक्षरीचे निवेदन आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना सादर केलेयावेळी नगरसेवक सतीश भोगे, जेष्ठ नेते मंदा शंकर,सह मादगी समाज बांधव उपस्थित होते यावेळी आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांनी मादगी समाज बांधवाशी सहानुभूतीपूर्वक सविस्तर चर्चा केली.








