सिरोंचा /प्रतिनिधी :-दि ०९/०८/२०२६:- दि ०६/०८/२०२६ ला राष्टवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा.तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांचा सिरोंचा तालुका दौरात सिरोंचा येथे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार बैठक घेण्यात आली बैठकीचे आयोजन आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रभाग क्रमांक ०२ मस्जिद समोरील निवासस्थानी करण्यात आले या बैठकीत राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षा मा. तनुश्री धर्मरावबाबा आत्राम व सारीका गडपल्लीवार महिला कार्याध्यक्षा तथा महिला तालुका अध्यक्षा अहेरी यांनी सिरोंचा तालुका महिला कार्यकारिणी ची नियुक्ती करण्यात आली यावेळी सिरोंचा तालुका महिला अध्यक्षा म्हणून ललिता शंकर सल्ला , महिला शहराध्यक्षा पदमा भगवान पिल्ली यांची तर युवती तालुका अध्यक्षा म्हणून सपना सम्मया तोकला यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मार्गदर्शन करताना तनुश्रीताई आत्राम मार्गदर्शन करताना पक्षाची विचारधारा जनतेमध्ये पोहचविणे, संघटना मजबूत करणे,पक्षाचा कार्यक्रमा मध्ये सक्रीय सहभाग घेणे,पक्षाचा धोरणानुसार प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले यावेळी नगराध्यक्षा पदमा भोगे, महिला जिल्हा उपाध्यक्षा व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,नगरउपाध्यक्ष बबलू पाशा, कार्यकारी जिल्हा अध्यक्ष बानय्या जनगाम,नगरसेवक नरेश अलोणे, नगरसेवक सतिश राचर्लावार, नगरसेवक सतिश भोगे, नगरसेवक जगदिश रालबंडीवार, पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार,शहर अध्यक्ष रवि सुलतान , ओमप्रकाश ताटीकोंडावार, सम्मया तोकला, मारोती गणपुरपू, पोचम आकुदारी,संजू पेद्दापल्ली,आदी सह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते







