सिरोंचा, दि. २३ सप्टेंबर २०२६ : सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती केली जाते. शेतकरी मोठ्या मेहनतीने प्रति एकर २० क्विंटलपेक्षा अधिक धानाचे उत्पादन घेत असताना, सध्या शासकीय धान खरेदी केंद्रांवर प्रति एकर केवळ १२ क्विंटल ६० किलो धानाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या तुलनेत शासकीय खरेदीची मर्यादा कमी असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासकीय खरेदीची मर्यादा कमी असल्यामुळे उर्वरित धान शेतकऱ्यांना नाइलाजास्तव खुल्या बाजारात अथवा व्यापाऱ्यांना कमी दराने विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रति एकर किमान २० क्विंटल धानाची शासकीय खरेदी करण्यात यावी, तसेच धान खरेदी केंद्रे वेळेवर सुरू करण्यात यावीत, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.या मागण्यांसाठी दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सिरोंचा तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच याच मागण्यांचे स्वतंत्र निवेदन तालुका कृषी अधिकारी, सिरोंचा यांनाही देण्यात आले.मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास सिरोंचा तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर जनआंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणारे शेतकरी रामप्रसाद शंकर रंगुवार, विशाल कृष्णाबाबू रंगुवार, मनोज लक्ष्मण रंगुवार, सोनू श्रीनिवास येतम, तिरुपती रामय्या मुद्दम, सुजित श्रीनिवास रंगुवार, सुरज शंकर रंगुवार, विश्वनाथ श्रीनिवास रिक्कूला, श्रीनिवास लक्ष्मीनारायण रंगुवार, पृथ्वीराज सदानंदाम तालपेल्ली, वेंकटेश संतोष तोकाला, लक्ष्मण गणपुरापू, अरुण मारगोणी, संजीवरेड्डी नरडेला, सागर पेद्दीन्टी, संतोष रिक्कूला, श्रीनिवास मुलकाला आदी शेतकरी.
हिंदू एकता पोर्टल
सिरोंचा तालुका प्रतिनिधी








