सिरोंच / प्रतिनिधी,दि १४/१०/२०२६:-सिरोंचा शहरातील जयस्तंभ मैदानावर दि १३/१०/२०२६ला राञो ८:००ते १२:००वाजे दरम्यान बतकम्मा उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या बतकम्मा उत्सव स्पर्धेची उद्घाटन सोहळा मा.तनुश्रीताई आञाम , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवती जिल्हा अध्यक्ष तथा सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ, यांच्या हस्ते प्राणहिता नदी तिरावर विराजमान बतकम्मा मुर्ती चे विधीवत पूजन करून नारळ अर्पण करून व कार्यक्रम स्थळी बतकम्मा चे पुजन करुण करण्यात आले यावेळी पौरोहित्य वेंकटरमण कोम्मेरा यांनी केले सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन आयोजकांनी स्वागत केले सदर बतकम्मा उत्सव आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मरावबाबा फँन्स क्लब व नगराध्यक्षा पदमाताई सतिश भोगे,व नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश रालबंडिवार, नगरसेवक सतीश भोगे यांच्या नेतृत्वाखाली व अकरा नगरसेवकांचा सहकार्याने साजरा करण्यात आला कार्यक्रमाला गणमान्य प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी,युवक, युवती, सर्व स्तरातील लोकांची उपस्थिती होती फेमस सिंगर हैदराबाद चा निर्मला राठोड यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांचे मने जिंकली, त्यांचा गायनावर उपस्थित महिला, युवक, युवती मनसोक्त नाचत, थिरकत होते या स्पर्धेत तेरा बतकम्मा चा सहभाग होता तेरा बतकम्मा चे परिक्षकानी योग्य रितीने निरिक्षण करुण प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देवून प्रथम क्रमांक ५५,०००/-द्वितीय ला३५,०००/-तृतीय ला २५,०००/-हजाराचे पारितोषिक देण्यात आले व उर्वरित बतकम्मा ला विशेष भेट देऊन गौरविण्यात आले यावेळी नगरसेवक नरेश अलोणे, रंजीत गागापुरपू, इम्तियाज खान,सतिश राचर्लावार, नगरसेविका नुसरत बाबर शेख,पदमा पिल्लीवार,ममता पिल्लीवार, भवानी गणपुरपू,बक्कू आकुदारी, महेश्वरी पेद्दापल्ली,सपना तोकला आदी चे सहकार्य लाभले प्रचंड जनसमुदाय चा साक्षीने हा बतकम्मा उत्सव आनंदी वातावरणात उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमा चे सूत्रसंचालन अँड फिरोज यांनी पार पाडले कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याकरिता पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.







