सिरोंचा (प्रतिनिधी) दि ०४/०८/२०२६:-, दरवर्षी चा प्रथा व परंपरेनुसार सिरोंचा नगरीची ग्रामदेवता म्हणून प्रख्यात असलेल्या शितला माता (पोचम्मा देवी)ला आरोग्य संपदा, पीकपाणी, गावात सुख शांती, समृध्दी नांदावी यासाठी पावसाळ्यात पीक पेरणीपूर्वी शितला मातेला साकडे घालण्यात येते या वेळी मंदिरात महिला, पुरुष,बालके यांची गर्दी पाहायला मिळते ग्रामदेवता चा पुजेसाठी महिला नियमित स्वयंपाका सोबत गोड धोड पदार्थ मनोभावे शुद्ध अंतःकरणाने उपशी राहून करतात मंदिरात जाऊन भक्तिभावाने देवीची पूजा करून नैवेद्य अर्पण करून आरती करतात हा क्रम आषाढ पौर्णिमा पासून सुरू होतो व आषाढ अमावस्या पर्यंत पंधरा दिवस चालतो गावातील हिंदू समाज मंदिरात जातात . गुरुवारी व रविवारी महत्वाचे दिवस मानतात व यादिवशी विशेष गर्दी पहायला मिळते शितला माता मंदिराचे पुजारी लक्ष्मीनारायण संगेम आलेल्या भाविकांना मार्गदर्शन करीत टिळा लावून आशीर्वाद देतात पूजारी ला सहाय्यक म्हणून त्यांचे पुत्र किरण संगेम हे मदत करतात शाकाहारी कुटुंब गोड पदार्थ बनवून नैवेद्य अर्पण करतात तर मांसाहार करणारे कुटुंब कोंबडा,बकरा, आदी नैवेद्य दाखवतात शितला माता मंदिर परिसरात दोन पोचम्मा देवी मंदिर आहे व एक महाकाली मंदिर आहे आलेले भाविक या तीनही मंदिरात पूजा करतात ग्रामदेवता मंदिर अतिशय महत्त्वाचे मानले जाते व प्रथम या मंदिरात पूजन करूनच अन्य मंदिरात जातात बेलदार समाज व ओडेवार समाज हे आप आपल्या प्रभागातील कुटुंबे वेगवेगळ्या दिवशी परंतु समाज बांधव एकत्र होऊन वाद्य वृंदासह जातात इतर समाज आप आपल्या परीने जातात या वेळी मंदिरात भक्तीमय आनंदी वातावरण पहायला मिळते.
हिंदू एकता पोर्टल ✍️







