संपादक श्री.नागभूषणम चकिनारपुवार
सिरोंचा :- दि २९/०६/२०२६:- प्राथमिक आरोग्य केंद्र रंगय्यापल्ली अंतर्गत, ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे दि २८जून २०२६ ला पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला._ सिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती पदमा भोगे यांच्या हस्ते फित कापून या लसीकरण मोहिमेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. _या प्रसंगी जिल्हा साथरोग अधिकारी मा. डॉ. पेंदाम यांची प्रमुख उपस्थिती होती. _उद्घाटनानंतर नगराध्यक्षा श्रीमती पदमा भोगे आणि डॉ. पेंदाम यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे थेंब (दोन थेंब आयुष्यभराचे) पाजण्यात आले._ या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डाॅ सचिन मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. साहरे श्री. झाडे आरोग्य सहाय्यक श्री.तिरूपती कोल्लुरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. नविन जन्नमवार, सा. आ. अधिकारी कु. बट्टीवार, आरोग्य सेवक श्री. एम. शेख, आरोग्य सेविका कु. गायकवाड यांच्यासह परिसरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.







