प्रतिनिधी
सिरोंचा २६/०६/२०२६:- दिनांक 24-06-2026 रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाणयांच्या कार्यालयीन टीमने सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान बूथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या बूथ समितीची पडताळणी करण्यात आली. तसेच पक्ष संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्यांबाबतसविस्तर चर्चा करण्यात आली. प्रदेश कार्यालयाचे श्री. संदीपजी वढेले व श्री. पृथ्वीराजजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील या टीमने कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांच्या सूचना व समस्या नोट केल्या. सर्व समस्या प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचवून मा. रवींद्रजी चव्हाण प्रदेश अध्यक्ष आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून त्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. शंकरभाऊ नरहरी ज्येष्ठ नेते श्री. सत्यनारायण मंचालवार सिरोंचा मंडळाचे पदाधिकारी, सर्व बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







