मुख्य संपादक : श्री सदानंद इंगिली
हिंदू एकता पोर्टल
गडचिरोली, सिरोंचा, दि. २४ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल, गडचिरोली यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा स्थापना दिन (२४ जून) विविध सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आज बुधवारी सकाळी ११.०० वाजता सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाद्वारे रुग्णांना फळांचे वितरण करून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समाजसेवा, मानवसेवा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंहा सिलवेरी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री सदानंद इंगिली, तालुका उपाध्यक्ष व्यंकटी रापेली, राष्ट्रीय बजरंग दल सिरोंचा तालुका उपाध्यक्ष श्री बापू नस्कुरी, ज्येष्ठ पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार, तसेच प्रकाशजी पुप्पलावर, रुपेश संगेम, श्याम मांडावर, गट्टू पोरनला, भगवान पिल्लीवर, नागेश येल्लेला, महेश गंगाधरी, सिधू नुसेटी, श्रीकांत चमक्करी, सन्मुख पेंडायला आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, समाजहिताच्या कार्यातून संघटनेचा जनसंपर्क अधिक दृढ होत असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमामुळे स्थापना दिनाला सामाजिक बांधिलकीची अर्थपूर्ण जोड मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







