मुख्य संपादक श्री सदानंद इंगिली
गडचिरोली, दि. २३ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल, गडचिरोली यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त (२४ जून) आयोजित पखवाडा कार्यक्रमांतर्गत आज मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नारायणपूर मुख्य चौक येथे शरबत वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.दि. २१ जून २०२६ ते ०५ जुलै २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना शरबताचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंहा सिलवेरी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री सदानंद इंगिली, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तालुका उपाध्यक्ष व्यंकटी रापेली, राष्ट्रीय बजरंग दल सिरोंचा तालुका उपाध्यक्ष श्री बापू नस्कुरी, नारायणपूर गाव अध्यक्ष रुद्रय्या दुंदु, हनुमान चालीसा केंद्र प्रमुख राजन्ना अन्नेला, राष्ट्रीय बजरंग दल सिरोंचा तालुका सचिव वेणुगोपाल श्रीकोंडा यांच्यासह मालय्या पान्ते, अशोक इंगिली, राजबापू नुकूम, सदानंद कडेकरी, चंद्रशेखर चेम्मकरी, वेंकटेश इंगिली, तोंबेरा दुर्गय्या, हुसेन तोंबेरा, श्रीनिवास कडेकरी, भास्कर अन्नेला, स्वामी नुकूम, तिरुपती नुसेटी, राजन्ना नुसेटी, वेंकटेश कडेकरी, हनुमंतु कडेकरी, राजू चेम्मकरी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच महिला वर्गातून तिरुमला नस्करी, स्वरूपा दुंदु, तिरुमला रापेली, पद्मा चमक्करी, सुलोचना नुसेटी, अपर्णा अन्नेला आदींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सेवा व जनसंपर्काचा संदेश देण्यात आला.







