सिरोंचा / प्रतिनिधी दि.३१/१०/२०२६:-बामणी सबस्टेशन येथील हाय पावर ट्रान्स फार्मर खराब झाल्याने या अंतर्गत येत असलेल्या रेंगुठा परिसरातील शेतकऱ्यांचा शेतातील तोंडात येणारा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे हायपावर ट्रान्स फार्मर तत्काळ दुरुस्ती अथवा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून शेतकरयाचा शेतातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा मागणी साठी रेंगुठा परिसरातील विविध गावांतील दिडशे शेतकरी तहसील कार्यालयावर व महावितरण कार्यालयावर धडकला; तहसीलदार यांचे मार्फत जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी नायब तहसीलदार राजू सिडाम यांनी निवेदन स्वीकारले महावितरण चा उपकार्यकारी अभियंता भरत बाल पांडे यांना निवेदन देवून सविस्तर व्यथा मांडली निवेदनानुसार, बामणी सबस्टेशन अंतर्गत परिसरातील ६० गावातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यात येत असलेला मोठी यंत्रणा खराब झाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अडचणी चा सामना करावा लागतो साठ गावातील शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर वरील मिरची,धान, मका व इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे करीता सदर बाब अत्यंत तातडीची असल्याने बामणी सबस्टेशन मधील 5 M V Aक्षमतेचा पावर ट्रान्स फार्मर तत्काळ दोन दिवसांत दुरुस्त अथवा आवश्यक असल्यास बदलून परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित करण्यात यावा अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनातून देण्यात आला तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देवून शेतकरी आपला आक्रोश मोर्चा महावितरण चा उपकार्यकारी अभियंता यांचा कार्यालयात धडकला यावेळी शेतकरी विद्युत पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे,व जय जवान जय किसान चे नारे देत होते सदर मोर्चा त रेंगुठा,नरसिहापल्ली,कोटापल्ली,मोयाबिन पेठा,पिरमेडा,पर्सेवाडा,बोंड्या, बोगटागुडम,दर्शेवाडा, झेंडा,टेकडा जाफराबाद,बोरमपल्ली,आदो गावातील शेतकरी उपस्थित होते या शेतकरयाचे नेतृत्व माजी उपसभापती सत्यनारायण परपटलावार, मधुकर कोल्लूरी, संतोष चंदावार यांनी केलेयावेळी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता भरत बालपांडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारसपल्ली येथील सब स्टेशन मधून बामणी सबस्टेशन अंतर्गत शेतकऱ्यांना रात्रोचा वेळी विद्युत पुरवठा करण्यात येत आहे येत्या तिन दिवसांत कुरखेडा येथून हायपावर ट्रान्स फार्मर आणुन बामणी सबस्टेशन येथे बसविण्यात येईल व शेतकऱ्यांची समस्या कायमची निकाली काढण्यात येईल असे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.







